diabetologist in nashik

साथीच्या रोगात मधुमेहाच्या रुग्णांसाठी निरोगी राहण्याचे मार्ग

साथीच्या रोगात मधुमेहाच्या रुग्णांसाठी निरोगी राहण्याचे

कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असून मधुमेह असलेल्या लोकांना साथीच्या आजाराचा धोका इतरांपेक्षा अधिक आहे. कोविड-१९ मध्ये सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे, मास्क घालणे, हात धुणे आणि गर्दी टाळणे गरजेचे आहे. जर आपणास मधुमेह असेल तर आणखी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

diabetologist in nashik

याबाबत रुग्णांशी ऑनलाइन संवाद साधताना मधुमेहतज्ज्ञ  (Diabetologist in Nashik)डॉ. आशुतोष सोनवणे यांनी माहिती दिली की, साथीच्या आजारात मधुमेहाच्या रुग्णांनी आपला मधुमेह नियंत्रणात आहे की नाही? हे सतत सुनिश्चित केले पाहिजे. अशावेळी आपण अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

अशी बाळगा सावधगिरी

  • आपण सर्व सामान्य सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, आपण घरी अडकला असाल तरीही निरोगी पर्याय निवडा.
  • कोविड-११ संसर्गामुळे आज घरातच राहणे आवश्यक झाले आहे. ज्यामुळे सामान्य जीवनशैलीत बदलली आहे. यामुळे अधिक स्नॅक्स खाणे, कमी हालचाली, आळशी आणि सुस्त जीवनशैली हे बदल होऊ शकतात, आणि या सर्वांमुळे ग्लुकोजच्या पातळीत वाढ होऊ शकते.
  • कोणत्याही नवीन जीवनशैलीतील बदल किंवा ताणतणाव, रक्तातील साखरेच्या वाढत्या पातळीस कारणीभूत ठरतात आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अधिक अवघड बनते. कोरोनाकाळात ही बाब मधुमेह रुग्णांसाठी चांगली नाही. म्हणूनच स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आता अतिरिक्त प्रयत्नांची गरज आहे, असे डॉ. आशुतोष सोनवणे यांनी सांगितले.

 

घरी अडकले असताना निरोगी राहण्याचे काही मार्ग

  • आपली औषधे सातत्याने आणि वेळेवर घ्या.
  • सक्रिय रहा आणि नियमितपणे व्यायाम करा
  • स्नॅक्स आणि अतिरिक्त खाणे कमी करा किंवा टाळा.

Reference Link:Divya Marathi

Read more...
Dr. Ashutosh Sonawane